बाष्पक नोंदणीकृत किंवा प्रमाणपत्र असल्याशिवाय वापरु नये.
प्रमाणपत्रावर नमूद केलेल्या तारखेनंतर बाष्पकचा वापरु नये.
बाष्पक प्रमाणित केलेल्या दाबापेक्षा उच्च दाबाला वापरु नये.
संबंधित व्यक्तीकडे नियमानुसार बाष्पकाचे प्रमाणपत्र नसेल तर बाष्पक वापरु नये
बाष्पकाचा/बाष्पकाच्या भागाचा स्फोट (फुटल्यास) झाल्यास २४ तासाच्या आत बाष्पके संचानालयास, अहवालासह
कळविणे आवश्यक आहे. अहवालात अपघाताची वर्णनात्मक माहिती देणे आवश्यक आहे, जसे अपघाताचे स्वरुप,
बाष्पकाचे नुकसान/बाष्पकाच्या भागांचे नुकसान/जखमी/मृत व्यक्ती किंवा मालमत्तेचे नुकसान ही सर्व माहिती
देणे जरुरी आहे.
बाष्पकाची दुरुस्ती, सांधकाम (वेल्डीग), टयूब बदली इत्यादी, संचालकांची लेखी स्वरुपात मान्यता असल्याशिवाय
वरील काम बाष्पक किंवा बाष्पकांच्या भागावर करु नये.