बाष्पकाच्या सुरक्षेच्या, श्रेष्टत्वाची वृध्दीकरीता वापरात असलेल्या बाष्पकाचे काटेकोरपणे तपासणी आणि जिवित व मालमत्तेचे, बाष्पकाच्या स्फोटांपासून संरक्षण आणि जतन.
राष्ट्रीय विकासाच्या वृध्दीकरीता, बाष्पकांचे उत्पादना दरम्यान काटेकोरपणे निरीक्षण करणे.
बाष्पकांच्या सुरक्षित वापराकरीता, बाष्पक परिचर आणि परिचलन अभियंत्यांची परीक्षा घेऊन, सक्षम मनुष्यबळ तयार करणे.
गतिमान, पारदर्शक सार्वजनिक देय व्यवस्थेच्या वचनबध्दतेसाठी, प्रक्रियांचे सुलभीकरण आणि संगणकासह, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे.
बाष्पक आणि प्रेशर वेसल्स यांची निर्मिती, तपासणी आणि अपघातांचे विश्लेषण, या क्षेत्रांमधील अग्रगण्य निरीक्षण संस्था असे श्रेष्टत्व जोपासण्याकरीता, आंतरराष्ट्रीय संस्थांशी बरोबरी करणे.
सुपर क्रिटीकल बाष्पकांची निर्मिती/निरीक्षण, या क्षेत्रामध्ये आधुनिक पध्दतीचा विकास करणे.
सौर उर्जेवर चालणा-या बाष्पकांची निर्मिती करणा-या संस्थांना मदत आणि प्रोत्साहन देणे.
बाष्पक संबंधी समूहामध्ये बाष्पकाच्या सुरक्षित आणि सक्षमपणे वापराकरीता, जनजागृती निर्माण करणे.